व्यसन
हा एक आजार आहे. तो शारीरीक, मानसिक, कौंटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा
आजार आहे. तो गुंतागुंतीचा आजार आहे. हा जन्मभराचा आजार आहे. पण त्यावर
नियंत्रण ठेवता येते. परत परत उद्भवणारा हा आजार असला तरी त्याची मानसिक
ओढ कमी करण्याचा, त्या ओढीवर मात करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. ती ओढ का
व कशी निर्माण होते हे समजल्यास अशी मात करता येते आणि माणूस वर्षानुवर्ष
व्यसनापासून दूर राहू शकतो.
मादक द्रव्याचं सेवन करण्यामागे एकच एक कारण आहे असं म्हणता येणार नाही.
एखादी व्यक्ती अशा प्रकारचं सेवन करण्यामागे निरनिराळी कारणं असू शकतात.
तरूण मुलं मादक द्रव्याचं सेवन का करतात?
-
प्रयोग करून बघण्याची इच्छा व उत्सुकता
-
कंटाळा
-
मित्रांचा दबाब
-
वैफल्य व औदासिन्य
-
पालकांकडून येणारा दबाव
-
शैक्षणिक दबाव
Blogger Comment
Facebook Comment