Cheap Rate - Best Products

गर्भधारणा - शस्त्रक्रियेने प्रसूती

शस्त्रक्रियेने प्रसूती
विशिष्ट शस्त्रक्रियेने प्रसुति
सिझेरियन सेक्शन म्हणजे शस्त्रक्रियेने बाळांना जन्म देण्याची पध्दत होय. यात आधी उदराला छेद देउन नंतर गर्भाशयाला छेद दिला जातो व बाळाला जन्म दिला जातो. हा छेद बहुतेक जननेंद्रियांच्या आसपासच्या केसाळ भागात दिला जातो. आणि हा छेद ‘बिकीनी कट’ या नावाने प्रसिध्द आहे. काही केसेसमध्ये हा छेद गर्भाशयाच्या खालच्या बाजूपासून उदराच्या वरच्या भागापर्यंत दिला जातो. काही वेळा कळा सुरू होण्याआधी शस्त्रक्रिया केली जाते, याची अनेक कारणे आहेत.
  • Having Placenta previa
  • Preeclampisa
  • मधुमेह (बाळ जर खूप मोठे असेल तर)
  • ओटीपोटाचा भाग जर बाळाचे डोके येउ न शकण्याइतका छोटा असेल
  • Rh - रोग, रक्ताचा एखादा रोग
  • जेव्हा बाळाचे डोके खाली नसेल, तेव्हा अशा स्थितीत विशिष्ट शस्त्रक्रियेने (Cesarean) प्रसुति केली जाते.
विशिष्ट प्रकारची शस्त्रक्रिया केली कशी जाते?
जर ही शस्त्रक्रिया आधीपासून ठरविलेली नसेल, तर तुमचे डॉक्टर त्याची आत्ता का गरज ते स्पष्ट करतील आणि यात कोणते धोके आहेत ते देखील सांगतील. बर्‍याचशा रूणालयात तुमच्या बाळाच्या जन्मात भागीदार असणार्‍यास या शस्त्रक्रियेच्या वेळी उपस्थित राहू देतात. या शस्त्रक्रियेला साधारण एक तास लागतो आणि त्यात खालील टप्प्यांचा समावेश होतो.
  • तुमच्या हातात सुई (IV) टोचली जाते. शस्त्रक्रियेच्या वेळी जर औषधे देण्याची गरज भासली तर ती यातून दिली जातात.
  • ओटीपोटाचा भाग निर्जंतुक केला जातो आणि जननेंद्रियाच्या आसपासचे केस काढले जातात.
  • परस्पर - जुळणी आणी इतर तपासण्यांसाठी रक्त घेतले जाते.
  • भूल दिली जाते जी मणक्यात दिली जाऊ शकते किंवा संपूर्ण दिली जाते. मूत्राशयात रबरी नळी (कॅथेटर) घातली जाते.
  • शस्त्रक्रियेच्या वेळी त्या मार्गे मूत्रविसर्जन होऊ शकते. उदराला आणि गर्भाशयाला छेद देणे. या छेदातून बाळ आणि नाळ बाहेर काढणे. नंतर छेद शिवून टाकणे.
गरोदरपणीचे पोषण
समजूतदारपणे जर पोषक पदार्थ आहारात घेतले तर नक्कीच तुमचे आणि तुमच्या बाळाचे पोषण चांगले होईल. जास्त उष्मांक मिळविण्यासाठी गरोदरपणी तुम्हाला बदल करावे लागतील. चांगले पोषण होण्याची गुरूकिल्ली समतोल आहार आहे.
मांस, कोंबड्या, मासे, कोरडे बीन्स, अंडी आणि टणक कक्वाची फळे
यातून ‘ब’ जीवनसत्व, प्रथिन, आयर्न आणि झिंक पुरविले जाते. शिजवलेल्या मटणातून, कोंबड्यामधून किंवा माशांमधून २-३ औंस मिळते.
या समुहातील इतर पदार्थांमध्ये, एक औंस मटन, १/२ कप शिजविलेले कोरडे बीन्स, एक अंडे किंवा २ टेबलस्पून पीनट बटर बरोबर असते.
दूध, योगर्ट, आणि चीज
हे पदार्थ म्हणजे प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि जीवनसत्वांचा साठा असतो. एक कप दूध किंवा योगर्ट, १ १/२ औंस नैसर्गिक चीज, किंवा २ औंस प्रक्रिया केलेले चीज याबरोबर असते.

जेव्हा शक्य असेल तेव्हा कमी चरबी असलेले पदार्थ निवडावेत, साय, मलई वगैरे पूर्णपणे काढलेले किंवा थोड्या प्रमाणात काढलेले दूध, जर तुम्हाला तुमच्या सुपर बाजारात उपलब्ध होतील यात योगर्ट- दूध आणि कमी दुग्धशर्करा असलेले पदार्थ असतात. जर तुम्हाला असे जाणवले की, दुधाचे पुरेसे पदार्थ उपलब्ध होत नाहीत, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून कॅल्शियमयुक्त इतर पदार्थांची माहिती घ्या.
फळे
हा समूह जीवनसत्व ‘अ’ ‘क’ पोटॅशियम आणी तंतू पुरविते. एक मध्यम सफरचंद, केळे किंवा संत्री, १/२ कप कापलेले, शिजवलेले किंवा डब्यातील फळे, किंवा सहा औंस फळांच्या रसाबरोबर असते. बरीज, सायट्रस फळे किंवा रस, कलिंगड आणि इतर फळे यात चांगल्या प्रमाणात जीवनसत्वे ‘ क’ असते. मनुका आणि Prunes देखील चांगले असतात.
भाज्या
यात जीवनसत्व ‘अ’ आणि ‘क’ आणि आयर्न व मॅग्नेशियम सारखे खनीजपदर्थ असतात ही चरबी कमी असते आणि तंतूमय असतात, त्यामुळे बध्दकोष्ठता होत नाही. एक कप कच्ची पालेभाजी (पालक, लेट्यूस, Lroccoli), १/२ कप इतर शिजवलेली किंवा कच्ची पालेभाजी (गाजर, रताळी, मका, पीज्‌. बटाटे) किंवा ३/४ कप भाजीच्या रसाबरोबर असते.
पाव, (Ereals, तांदूळ आणि Pastas)
यातून शक्तीचा मुख्य स्त्रोत कर्बोदके (स्टार्च) मिळतो, त्याबरोबरच जीवनसत्वे, खनीजपदार्थ आणि तंतूमय पदार्थ मिळतात. पावाचा एक स्लाईस, एक औंस Cereal, किंवा १/२ कप शिजविलेले Cereal, तांदूळ किंवा पास्ता. या बरोबर असतो. शक्यतो संपूर्ण धान्यापासून-कडधान्यापासून बनविलेले आणि कमी साखर असलेले पदार्थ घ्यावेत.
चरबी, तेल आणि मिठाई
या पदार्थामध्ये उष्मांक जास्त असतात आणि जीवनसत्व किंवा खनीजपदार्थ कमी चरबी असलेल पदार्थ घेण्याचा प्रयत्‍न करावा.
लोहाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ
बर्‍याचशा स्त्रियांमध्येही प्रमाणात रक्तातील लाल पेशी कमी असतात. मासिक पाळी, अनियमित व अयोग्य आहार किंवा आधीचे गरोदरपण ही त्याची काही कारणे होत. म्हणून गरोदर होण्याआधी पासून तुम्ही तुमच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढविल पाहिजे. मांस मनुका, सोयाबीनची उत्पादने, पालक आणि गव्हाचे सत्व यांच्या प्रयोगाने तुमच लोहाचे प्रमाण वाढेल गरोदर असताना लोहाची गरज रोज दुप्पट होत असते.
SHARE
    Blogger Comment
    Facebook Comment