स्वमदत गट ही आजारातून बरे होण्यासाठी असलेली एक सुंदर मानसिक ताकद
आहे. सहवेदनेतून जाणाऱ्या व्यक्ती जेव्हा एकत्र जमतात, तेव्हा त्यांना
जाणिव होते की ‘आपण एकटेच नाही. हा आजार असलेली इतर कितीतरी माणसे आहेत.’
स्वमदत गटात नियमीत आल्याने रुग्णांची मानसिक उभारी वाढते, त्यांच्यामधे एक
धैर्य निर्माण होते, आणि ते आजाराला सकारात्मक रितीने जास्त चांगले सामोरे
जातात. आजाराविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी रुग्णांना स्वमदत गटामुळे
एक मंच मिळतो. तसेच रुग्णांच्या पलकांचे, पती-पत्नींचे स्वमदत गटही तयार
होतात, आणि त्यांनाही मोकळा श्वास घ्यायला एक आश्वासक जागा मिळते.
व्यसनाधीनता, एपिलेप्सी, एड्स, कॅन्सर स्वमदत गट ही आरोग्य डॉट कॉम वरील
अॅक्टीव्ह स्वमदत गटांची उत्तम उदाहरणे आहेत.
Blogger Comment
Facebook Comment