डिप्रेशनच का?
जागतिक आरोग्य संघटनेने येत्या पाच वर्षात माणसांची कार्यक्षमता घालविणारा/ घटविणारा आणि तापदायक/त्रासदायक असा आजार ठरण्याची शक्यता वर्तवली आहे. कदाचित हृदयरोगाने त्रासलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त माणसं डिप्रेशन आजाराचे बळी ठरण्याची शक्यता आहे. पण लोकांना या आजाराबाबत जाणीव कमीच आहे.
आरोग्य डॉट कॉम या वेबसाईटवर आनंदपथने तयार केलेला डिप्रेशन या आजाराची समग्र माहिती देणारा विभाग सुरू करीत आहोत
आरोग्य डॉट कॉम व आनंदपथ सुरूवात ‘डिप्रेशन’ का करावी?
आनंदपथचं ब्रीदवाक्य आहे.
Happiness is the path!
डिप्रेशन म्हणजे आनंदमार्ग हरविणे-आनंदपथ मानतं की डिप्रेशनच्या दिशेने जाणार्या, डिप्रेशनमध्ये अडकलेल्या सर्वांनाच ‘आनंद-पथची’गरज आहे.
स्वरूप
डिप्रेशन एक भावना, डिप्रेशन प्रकार डिप्रेशन आणि कुटुंबीय, उपचार, स्वमदत गट आणि प्रतिबंध याबाबत सर्वसामान्य माणसाला कळेल अशा सोप्या भाषेत अनुभवांवर आधारीत माहिती देतील.
मग प्रेक्षकांच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही केवळ ‘टॉकशो’ करून थांबणार नाही. तर प्रेक्षकांना तिथल्या तिथं शंकाचं निरसन करता येणं शक्य होणार आहे.
डिप्रेशन आजाराच्या उपचारात मानसोपचारांचे विशेष महत्व आहे. त्या कार्यक्रमादिवशी नोंदणी करणार्या सर्व व्यक्तींना डॉक्टरी इलाज आणि मानसोपचारांच्या सोयीसाठी विशेष सवलत देण्यात येईल. दि. २ सप्टेंबर २००० पासून दर बुधवारी होणारा ‘सुपंथ’ हा समुहउपचार गट आम्ही सुरू करत आहोत. सहा आठवडे चालणार्या या गटाची फी फक्त रू ३००/- असेल.
स्वमदत गट आरोग्य डॉट कॉम च्या सहकार्याने २ ऑक्टोंबर २००० पासुन डिप्रेशनच्या पेशंटसाठी विनामुल्य स्वमदत गट सुरू करत आहोत. या बाबत डिप्रेशन ऍनॉनिमस या स्वमदत गटाशी संपर्क चालू आहे. त्याचप्रमाणे डॉ. उल्हास लुकतुके यांनी स्वमदत गट सुरू केला होता त्यांचे मार्गदर्शन आम्ही मागणार आहोत. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर दरम्यान आकाशवाणीवर ‘मानसगाथा’ या कार्यक्रमाद्वारे गृहिणींशी हितगुज साधण्याचा प्रयत्न ‘आनंदपथ’ करीत आहे.
सायकोथेरपीज/मानसोपचार
डिप्रेशनच्या आजारात, मानसोपचाराचे विशेष महत्व आहे. बोधक प्रक्रियेशी संबंधित मानसोपचारांचा विशेष उपयोग होतो.
Blogger Comment
Facebook Comment